Hot Posts

6/recent/ticker-posts

दोन हजाराची लाच घेताना वाशी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांसह एका खाजगी इसमास अटक, धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

दोन हजाराची लाच घेताना वाशी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांसह एका खाजगी इसमास अटक, धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


धाराशिव:  जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वाशी पोलीस ठाण्यामधील पोलीस शिपायास एका खाजगी व्यक्तीस दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात  ताब्यात घेतले आहे.तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी ही लाच घेण्यात आली. वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तानाजी ञिबंक तांबे,वय (२८),रणजित अनिल कासारे वय,(३१) व अन्य एक खाजगी इसम,पवन राजेंद्र हिंगमिरे वय(२६) अशी आरोपींचे नावे आहेत.

यातील तक्रारदार यांचेविरुद्ध वाशी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये यातील आरोपी क्रमांक १ यांनी यातील तक्रारदार यांना तुमच्या विरुद्ध 107 प्रमाणे प्लेन चॅप्टर / किरकोळ कारवाई करण्यासाठी मी बिट अंमलदार यांना सांगितले होते त्यामुळे त्यांनी किरकोळ कारवाईचा रिपोर्ट पाठविला आहे. त्या बदल्यात व तक्रारदार यांचे पत्नीस समजावून सांगून सदरची तक्रार मिटवून घेण्यासाठी व पुन्हा तक्रार देऊन त्रास देवु नको असे सांगण्यासाठी लाचमागणी पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक १ यांनी आरोपी क्रमांक ०२ यांचेकरवी पंचा समक्ष २०००/-रुपये लाचेची मागणी केली. सापळा कारवाई दरम्यान आरोपी क्रमांक ०१ याने लाचेची रक्कम खाजगी इसम आरोपी क्रमांक ०३ यांच्याकडे देण्यास सांगितले असता आरोपी क्रमांक ३ यांनी सदर २०००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने सदर ०२ आरोपी लोकसेवक व ०१ खाजगी इसम यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

यामध्ये  सापळा अधिकारी म्हणून नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिले ,सापळा पर्यवेक्षण अधिकारी - सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक,  मार्गदर्शक - मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक ,तर सापळा पथकात – पोलीस अमलदार सिद्धेश्वर तावसकर , अविनाश आचार्य यांचा समावेश आहे.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*
कार्यालय 02472 222879
टोल फ्री क्रमांक.1064

 

Post a Comment

0 Comments