पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष विकास भाऊ सुसर यांचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व खाऊवाटप करून बारामतीत साजरा
पुणे : पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष विकास भाऊ सुसर यांचा वाढदिवस बारामती शहर पोलीस बाईच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारामती शहर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी सुप्रिया कांबळे व निर्भया पथक बारामती विभागच्या महिला पोलीस अधिकारी ज्योती जाधव तसेच काँग्रेसचे ओबीसी चे उपाध्यक्ष रोहित बनकर हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना महिला पोलीस अधिकारी यांनी बारामती शहर पोलीस बॉईज ने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा देखील दिल्या. महाराष्ट्रात या संघटनेने पोलिसांच्या मुलांना रनिंग मध्ये पाच सेकंद चा वेळ वाढवून व पाच टक्के आरक्षण मिळवून देणारी एकमेव संघटना म्हणून या संघटनेकडे पाहिले जाते.
यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय (नाना) दराडे, बारामती शहराध्यक्ष शितल शहा, संघटनेचे विधी सल्लागार अँड. मेघराज नालंदे, अँड ओंकार इंगुले, पत्रकार माधव झगडे, योद्धा चे संपादक नाना (भाऊ) नालंदे, बारामती समाचार चे संपादक स्वप्निल कांबळे, बारामती नगरपरिषद चे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक विजय सोनवणे, कोषाध्यक्ष विनीत किर्वे, कार्याध्यक्ष सुशील कुमार शैलेश सोनवणे, सचिव प्रतीक झगडे, उद्योजक संजय (अण्णा) शिंदे, अमोल गायकवाड, बाळासाहेब डोळस, कल्याण मोहिते, रोबट गायकवाड, पोलीस बॉईज असोसिएशनचे बारामती महिला शहराध्यक्ष नंदनी गुंदेचा, विद्यार्थी आघाडीच्या शहराध्यक्ष गहना राममोहन येडला, उपाध्यक्ष श्रेया पळशीकर, सचिव सृष्टी झगडे यादी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments