Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: मागील भांडणाच्या कारणावरून तलवारीने केले वार

धाराशिव:  मागील भांडणाच्या कारणावरून तलवारीने केले वार

धाराशिव : तालुक्यातील शेकापुर साठे नगर येथे मागील भांडणाच्या कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमवून एकाच जिवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून तलवारीने काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की शेकापूर गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ भारत विधाते यांचे किराणा दुकान आहे. या दुकानासमोर फिर्यादी विलास बाबू कांबळे वय 37 यांनी मागील भांडणाच्या कारणावरून गैरकार्याची मंडळी जमवून सोमवारी ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करण्यात आली. आरोपी सचिन आप्पासाहेब विधाते, सागर गोरोबा उर्फ सुरेश विधाते, देवराज बाबासाहेब विधाते, रवी आप्पासाहेब विधाते, अमोल खंडू विधाते, आप्पासाहेब खंडू विधाते, राहुल श्रावण विधाते, अविनाश अमोल विधाते सर्व राहणार शेकापूर तालुका जिल्हा धाराशिव यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करून जखमी केले याप्रकरणी आठ जनावर कलम 307 326 504 च्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments