Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून सात शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून सात शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता


नाशिक : सार्वजनिक पानंदरस्ता खुला करण्यासाठी गेलेल्या मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तलाठी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्या प्रकरणी बागलाण तालुक्यातील आसखेडा येथील सात शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा सिद्ध न झाल्याने न्यायालयाने या साथही शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या बाजूने ऍडव्होकेट सुधीर अक्कर यांनी कामकाज पाहिले.

येथील असिस्टंट सेशन कोर्टाचे न्यायाधीश एसबी भाजीपाले यांनी याप्रकरणी निकाल दिला आहे. बागलाण तालुक्यातील आसखेडा येथे शिवबांधते फोपीर गोराणे येथे दिनांक 25 जानेवारी 2014 रोजी सार्वजनिक आनंद वहिवाट रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला करण्यासाठी पथक गेली होती. नामपुर येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत अहिरे नायब तशिलदार आबासाहेब तांबे पोलीस तलाठी सर्व पथक दोन जेसीबी घेऊन घटनास्थळी पोचले होते. यावेळी गोराने शिवारातील मोतीराम रामभाऊ देसले यांच्या मालकीच्या शेतात पोचले यावेळी रस्ता खुला करून देण्यासाठी गेलेल्या पथकासमोर विठ्ठल मोतीराम देसले यांच्यासह आठ जणांनी पथकाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकरी महिला वंदना खंडू देसले यांनी अंगावर रक्कम टाकण्याचा प्रयत्न केला होता, तर मोतीराम रामभाऊ देसले यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणी मालेगाव न्यायालयात एस बी भाजीपाले यांच्या न्यायालयात खटला चालविण्यात आला यावेळी संशयित शेतकऱ्याविरुद्ध कुठलाही ठोस पुरावा पोलिसांकडून सादर करण्यात आला नाही.

त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 100 ते 150 लोकांच्या जमावांमध्ये हे शेतकरी उपस्थित असल्याचा पुरावा न मिळू शकल्याने न्या श्री. भाजीपाले यांनी शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे संबंधित शेतकऱ्यांच्या वतीने एडवोकेट सुधीर अक्कर यांनी कामकाज पाहिले तर त्यांना एडवोकेट लक्ष्मीकांत सुरसे एडवोकेट योगेश निकल,प्रितम इंगळे यांनी मदत केली.

Post a Comment

0 Comments