Hot Posts

6/recent/ticker-posts

वृद्धाला ऑनलाइन शॉपिंग भोवली,१.१८ लाखाचा घातला गंडा

वृद्धाला ऑनलाइन शॉपिंग भोवली,१.१८ लाखाचा घातला गंडा

गोंदिया : ऑनलाइन पेमेंट मुळे नक्कीच सोय होत असली तरी आता त्याचा गैरवापर करून लोकांना गंडविले जात असल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत याचीच प्रचिती शहरातील रेलटोली परिसरातील वृद्धासोबत घडलेल्या प्रकारातून आली आहे त्यांना रिमोट आयडी देऊन सायबर चोरट्याने त्यांच्या खात्यातून एक लाख 18 हजार 495 रुपये काढून घेतले 28 डिसेंबर रोजी हा सर्व प्रकार उघडकीस आला.

याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत रेलटोली परिसरातील रहिवासी फिर्यादी संतोष नरेंद्र सिंह प्रमर वय 62 यांनी त्यांच्या मोबाईलद्वारे 25 डिसेंबर रोजी स्पेन डील अँप वर ऑनलाईन पेमेंट करून पाचशे रुपयाची कपडे खरेदी केले. मात्र त्यांना ते कपडे आवडले नसल्याने त्यांनी परत करण्यासाठी 27 डिसेंबर रोजी आपल्या मोबाईल ने गुगल वरून स्नॅपडील च्या कस्टमर केअरचा क्रमांक शोधून त्यावर संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र 28 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजे दरम्यान त्यांना 70 57 94 41 45 या क्रमांकावरून फोन आला व तुमची तक्रार मिळाली असून तुम्हाला पैसे परत करायचे आहे असे बोलून त्या व्यक्तीने एक रिमोट आयडी दिली. तसेच त्या आयडीच्या मदतीने आरोपीने फिर्यादीच्या आईच्या बँक ऑफ बडोदा मधील खात्यातून 72 हजार 998, भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून 20501 रुपये व मोठ्या बहिणीच्या खात्यातून 24,996 रुपये असे एकूण एक लाख 18 हजार 495 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी 17 जानेवारी रोजी भारतीय दंड विधी कलम 420 सह कलम 66 66 सी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Post a Comment

0 Comments