Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा कुणबी नोंदीचे दस्तऐवज मागविण्यासाठी काटी ग्रामपंचायतचे तहसीलदारांना निवेदन

मराठा कुणबी नोंदीचे दस्तऐवज मागविण्यासाठी काटी ग्रामपंचायतचे तहसीलदारांना निवेदन


तुळजापुर :- तालुक्यातील काटी, सावरगाव परिसरातील गावातील मराठा कुणबीच्या नोंदी बार्शी तहसील कार्यालयात आढळून आल्याची माहिती समजल्यावरुन काटी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने  सरपंच  परिषदेतचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच पती सुजित हंगरगेकर, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, वडगाव (काटी) चे सरपंच गौरीशंकर कोडगिरे, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, माळी  समाजाचे रणजित  बामणकर यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे  यांना  बार्शी तहसील कार्यालयातून मराठा नोंदी असल्याचे दस्तऐवज मागवून घ्यावेत या संदर्भात निवेदन दिले आहे.

यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी बार्शी तहसील मध्ये मराठा कुणबीच्या नोंदी तपासून तात्काळ मागवून घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0 Comments