तुळजापुर :सरकारी कामात अडथळा ,एकावर गुन्हा दाखल
धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील तलाठी सज्जा सिंदफळ अतिरिक्त कार्यभार तडवळा व बोरी येथील तलाठी गजानन नारायण कांबळे हे शासकीय कामकाज करत असताना आरोपी दाजी निवृत्ती माने शिरोढोण ता.तुळजापुर यांनीफिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन लॅपटॉपचा डीएससी व पेनड्राईव्ह हिसकावून घेवून शासकिय कमात अडथळा निर्माण करुन निघून गेला अशी फिर्याद कांबळे यांनी दिली आहे याप्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांना मिळालेली सविस्तर माहिती,आरोपी नामे-दाजी निवृत्ती माने, रा. शिराढोण, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 12.01.2024 रोजी 14.00 वा. सु. सज्जा कार्यालय मातोश्री लॉज शेजारी तुळजापूर येथे फिर्यादी नामे- गजानन नारायण कांबळे, वय 54 वर्षे, व्यवसाय- तलाठी सज्जा सिंदफळ अतिरिक्त कार्यभार तडवळा व बोरी रा. प्रतिक्षा नगर कदम हॉस्पीटल च्या पाठीमागे जाणारे रोडव्र तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे शासकीय कामकाज करत असताना नमुद आरोपी हा दारु पिवून आला फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन लॅपटॉपचा डीएससी व पेनड्राईव्ह हिसकावून घेवून शासकिय कमात अडथळा निर्माण करुन निघून गेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गजानन कांबळे यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 353,332, 327, 504,506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments