धाराशिव अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष यांच्या निवडी जाहीर
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागच्या जिल्हाध्यक्ष,जिल्हा कार्याध्यक्ष , शहराध्यक्ष व शहर कार्याध्यक्ष पदांच्या निवडी करण्यात आल्या. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ( दि. 17 ) निवडीबाबतचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते धाराशिव (उस्मानाबाद) अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदी असद खां पठाण , धाराशिव (उस्मानाबाद)अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्षपदी महंमद अबूबकर कोतवाल, धाराशिव (उस्मानाबाद) अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पदी अरफात शफिक काझी व धाराशिव (उस्मानाबाद) अल्पसंख्यांक शहर कार्याध्यक्षपदी समीर खतीब यांना देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी वैद्यकीय व शिक्षण सहाय्य मंत्री मा.ना हसनजी मुश्रीफ साहेब, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे साहेब, अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रिस भाई नायकवाडी,अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष व धाराशिव अल्पसंख्याकशहराध्यक्ष व शहर कार्याध्यक्ष या पदांसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या वतीने अल्पसंख्यांचे प्रदेशाध्यक्ष मा.इद्रिसभाई नायकवाडी यांना शिफारस करण्यात आली होती.
नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी असे म्हणाले की प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे व प्रमुख नेते यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यात पक्षाचे काम करू व दिलेल्या संधीचे सोने करीन.
0 Comments