तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी याञेस प्रारंभ, हजारो भाविक दाखल
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेत हजारो भाविकांनी दंडवत घेतला, यावेळी आराधी, वाघ्या, मुरळी पोतराज गीताने मंदिर परिसरात भक्तिमयवातावरण निर्माण झाले होते. दोन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले होते. यात्रेनिमित्त सोमवार व मंगळवार च्या मध्यरात्री १२:३० वाजता देवीचा अभिषेक व महापूजा आरती करण्यात आली. यानंतर गाव ते मंदिर या एक किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडण्यात आला. यामध्ये गावातील शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी आई राजा उदो उदो चिवरी आईचा चांगभलं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. मंगळवारी दिवसभरात नवीन पोतराजांना दीक्षा देणे, लहान मुलाचे जावळ काढणे, मानकरी वाणी पाटील ,मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे घोंगड्यात भात झेलणे यासह मानपानाची विधी पार पडले यानंतर रात्री दहा , रात्री शोभेच्या दारूकामासह हलगीच्या वाद्यांमध्ये महालक्ष्मीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात्रेमध्ये लहान मुलांच्या करमणुकीसाठी पाळणे दुकाने सजली आहेत, , तर यात्रेमध्ये भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागल्याचे चित्र दिसून आले. तसेच यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,
0 Comments