Hot Posts

6/recent/ticker-posts

भूम तालुक्यात एकाच रात्री चार घरे चोरट्याने फोडली लाखोंचा ऐवज लंपास,

भूम तालुक्यात एकाच रात्री चार घरे चोरट्याने फोडली लाखोंचा ऐवज लंपास


धाराशिव : भूम तालुक्यातील हिवरा येथे अज्ञात चोरट्याने चार ठिकाणी घरफोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केला आहे ही घटना रविवारी दिनांक 17 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने हिवरा गावासह भूम तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, याबाबत पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार भूम तालुक्यातील हिवरा येथील किसन जगदाळे हे तेरखेडा येथे मुलीच भेटण्यास गेली होते, यावेळी शनिवारी रात्री त्यांच्या पत्नी व एक मुलगी अंगणात झोपले होत्या याचा फायदा घेत चोरट्याने घराचा गेटचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर खोलीतील कपाट तोडून चोरट्याने 13 ते 14 तोळे सोन्याचे दागिने व रोख 25 हजार रुपये चोरून नेले, तर दुसऱ्या घटनेत सुनील जगदाळे हे परगावी गेले होते, घरी कोणीही नाही हे लक्षात घेऊन चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला

येथील सोन्याचे गंठण कानातले दागिने व रोख 25 हजार रुपये चोरट्याने चोरून नेले, तिसऱ्या घटनेत चोरट्याने बलभीम जगदाळे यांच्या घरातील सदस्य हे घराच्या गच्चीवर झोपले असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला या घरातील पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले, तर चौथ्या घटनेत ऋषिकांत जगदाळे यांच्या घरीही चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला मात्र जगदाळे कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले असल्याने येथे चोरट्यांना चोरीची संधी मिळाली नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर या चोरीचा सर्व प्रकार उघडकीस आला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांनी पोलीस नाईक बीएल पौळ, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कवडे यांच्या सर घटनास्थळी भेट देऊन पाहणे करून तात्काळ पंचनामा केला. एकाच रात्री चोरट्याने चार घरी फोडल्याने पोलिसांसमोर या चोरट्याने आव्हान उभे केले आहे, याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती बालाघाट न्यूज टाइम्स भूम धाराशिव

Post a Comment

0 Comments