तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे सेवानिवृत्तीनिमित्त जवान धनराज झांबरे यांचा सत्कार
चिवरी : देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील जवान धनराज अण्णाराव झांबरे यांचा ग्रामपंचायत कार्यालय ,विविध विकास कार्यकारी सोसायटी, मित्रपरिवार यांच्यावतीने जल्लोषात स्वागत करून भव्य नागरी सत्कार करण्यात आले . ३ मार्च रोजी रविवारी हा स्वागत समारोह झाला, चिवरी येथील धनराज अण्णाराव झांबरे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ३ मार्च रोजी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले.३ मार्च रोजी ते आपल्या मूळ गावी चिवरी येथे येणार असल्याने गावकयांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. येथील वेशीपासून मारुती मंदिरापर्यंत पुष्पवृष्टी करून राष्ट्रभक्तीपर गीतांच्या निनादात शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आला याप्रसंगी विकास सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे,व्हाइस चेअरमन मोतीराम चिमणे, सरपंच पिंटू बिराजदार, उपसरपंच लक्ष्मण लबडे,प्रा. शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच बालाजी पाटील, सचिन बिराजदार,किसन शिंदे,मोहन इंगळे,महेश बलसुरे, माजी सैनिक विठ्ठल होगाडे, विष्णू परीट, संभाजी काळजाते आदीसह ग्रामपंचायत सदस्य विविध विकास कार्यकारी सोसायटी सदस्य, गावातील तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments