वरातीत बँड बंद केल्याच्या रागातून एका तरुणास बांबूने मारहाण
धाराशिव :वरातीत नाचत असताना बँड बंद करायला लावल्याच्या रागातून तिघांनी एका तरुणास बांबूने मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील आंबेहोळ येथे घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील आंबेहळ येथे 27 फेब्रुवारी रोजी लग्नाची निघाली होती. यात नाचत असताना गावातील शाळेसमोर समीर लतीफ शेख या तरुणाने बँड बंद करायला लावला याचा राग मनात धरून आरोपी शाहरुख शेख, कादर शेख, शशिकांत गायकवाड या तिघांनी समीर या बांबूने डोक्यात मारहाण करून जखमी केले. उपचार घेऊन समीर शेख यांनी गुरुवारी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाघाट न्यूज टाइम्स धाराशिव
0 Comments