श्रीपतराव भोसले जूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जेईई मुख्य परीक्षेत यश
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेज, धाराशिव, येथील विज्ञान शाखेतील फोटॉन बॅचच्या वतीने जेईई, नीट व सीईटीची पूर्वतयारी करण्यासाठी विशेष वर्ग चालवले जातात. देशभरात जेईई परीक्षेसाठीची स्पर्धा प्रचंड असल्यामुळे दिल्ली, कोठा येथील तज्ञ प्राध्यापकांची गरज भासते. असाच तज्ञ प्राध्यापकांच्या माध्यमातून फोटॉन बॅच सातत्याने गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे काम करत आलेली आहे. आज राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत देशपातळीवर घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेश पुर्व परीक्षेचा (JEE Mains) निकाल जाहीर झाला. या परीक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थी सावंत प्रकाश शरद यास एकूण ९०.२४ टक्के व अपसिंगेकर पद्मक्ष चंद्रप्रकाश यास ८८.४४ टक्के गुण संपादन करून जेईई ॲडव्हांस परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी देशभरातून जेईई परीक्षेसाठी सर्वात जास्त विद्यार्थी बसले होते. जेईई ॲडव्हांस पात्र विद्यार्थ्यांना एनआयटी, आयआयटी मध्ये प्रवेश मिळतो.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य भैय्या पाटील सर, प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घारगे सर, फोटॉन बॅचचे प्रमुख प्रा. श्री. ए. व्ही. भगत सर, रिपिटर बॅचचे प्रमुख प्रा. पुजारी डी. व्ही. सर तसेच फोटॉन बॅचला, विज्ञान शाखेला अध्यापन करणारे सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments