Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकसभेच्या रणधुमाळीत प्रचार करताना उमेदवारांचा निघणार घाम! ऊन्हाचा तडाका वाढल्याने मतदारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान

लोकसभेच्या रणधुमाळीत प्रचार करताना उमेदवारांचा निघणार घाम! ऊन्हाचा तडाका वाढल्याने मतदारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान 


धाराशिव: जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय रणधुमाळीत एप्रिल महिना सुरू होताच ऊन्हाचा   तडका देखील वाढू लागला आहे. उन्हाळ्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्यामुळे कडक ऊन्हात प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा घाम निघणार आहे. उमेदवार रणरणत्या उन्हात प्रचार करण्यापेक्षा सोशल मीडियाचा वापर करीत आहेत, विविध पक्षाचे उमेदवार कार्यकर्ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहेत, वाढत्या तापमानाबरोबरच लोकसभा निवडणुकीचाही ज्वरही वाढु लागला आहे. लाखोंच्या संख्येने असलेल्या कानाकोपऱ्यातील मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन उमेदवारासमोर आहे.

धाराशिव जिल्ह्यातील मतदार संघातील ७ मे रोजी मतदान होणार आहे, तत्पूर्वी उमेदवारी अर्ज भरणे माघारीची प्रक्रिया आणि नंतर प्रत्यक्ष मतदान होणार आहे मात्र मतदारसंघात प्रमुख उमेदवार निश्चित झाले आहेत. अधिकृत उमेदवारांसह पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावर हायटेक प्रचाराचा फंडा सुरू झाला आहे. काही दिवसात कमालीची बदलली राजकीय समीकरणे आरोप प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता अंग झटकून कामाला लागला आहे. आपल्या पक्षाची बाजू रेटून नेत असल्यामुळे मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागात राजकीय पारा चढू लागला आहे. राजकीय पारा चढत असताना ऐन उन्हाळ्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे मतदारापर्यंत पोहोचण्याची आव्हान सर्वच उमेदवारापुढे आहे. कडक उन्हामुळे उमेदवार व राजकीय पक्षांना सकाळी व सायंकाळी प्रचार करण्याचा मेळ साधावा लागणार आहे निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचारासाठी कालावधी अधिक असला तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून हा कालावधी कमी राहणार आहे. अनेक उमेदवार रणरणत्या उन्हात प्रचार करण्यापेक्षा सोशल मीडियाचा वापर करीत आहेत.

लोकसभा रणधुमाळीचा प्रचार करताना उमेदवारांचा नक्कीच घाम निघणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघ बहुतांश ग्रामीण भागात आहे गाव खेड्यापर्यंत पोहोचताना उन्हाचा तडाका उमेदवार आणि कार्यकर्त्यांना सहन करावा लागणार आहे

Post a Comment

0 Comments