लग्न का जमवू देत नाही म्हणून एकास मारहाण नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
धाराशिव : दीपक कांबळे यांचे लग्न का जमू देत नाहीस असे म्हणत एका शिवीगाळ करून दगडाने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही घटना तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे समाज मंदिराजवळील वट्ट्यावर दिनांक 26 रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार आरोपी दीपक उर्फ धोंडूच्या विजय कांबळे, विश्वास उर्फ चिवड्या आप्पा उबाळे, शेख सिताराम गायकवाड राहणार केशेगाव तालुका तुळजापूर यांनी दिनांक 26 रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गावातील समाज मंदिराच्या वाट्यावर फिर्यादी नवलिंग कांबळे यांचा भाचा अमोल रमेश बनसोडे राहणार केशेगाव यास दीपक कांबळे यांची लग्न तू का जमवू देत नाही या कारणावरून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
0 Comments