Hot Posts

6/recent/ticker-posts

संचिका गहाळ केल्याप्रकरणी तलाठी हाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

संचिका गहाळ केल्याप्रकरणी तलाठी हाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

धाराशिव : संचिका गहाळ केल्याप्रकरणी भूम तालुक्यातील चिंचोली येथील तत्कालीन तलाठी युवराज हाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भूम न्यायालयाने सोमवारी दिनांक 15 रोजी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.

भूम तालुक्यातील चिंचोली येथे 2013 मध्ये श्री हाके हे तलाठी पदावर कार्यरत होते त्यावेळी अशोक सोपान जिंत पुरे राहणार भूम यांनी देवदत्त सुरेश नवले व अंजली सुरेश नवले यांच्या वतीने फेरफार करण्यासाठी अर्ज केला होता. ती फेरफार संचिका तलाठी युवराज हाके यांनी गहाळ  केली अशी तक्रार फिर्यादी अजिंक्य बारगजे राहणार भूम यांनी तलाठी तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयात दिली होती प्रशासनाने या तक्रारीची कसली दखल घेतली नाही त्यामुळे फिर्यादी बारगजे यांनी तलाठी हक्के यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली याप्रकरणी सुनावणी न्यायाधीश एस जे पाटील यांच्या समोर झाली या प्रकरणी न्यायालयाने कागदपत्राची पडताळणी करून श्री हक्के यांच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 नुसार गुन्हा दाखल करण्याची भूम पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले फिर्यादीच्या वतीने एडवोकेट धनंजय पाटील यांनी न्यायालयात भक्कम बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments