तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे वीज कोसळून म्हैस ठार,तर शेतकरी जखमी
चिवरी/ प्रतिनिधी शत्रुघ्न बिराजदार: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे शनिवार दि.२० रोजी झालेल्या मेघगर्जनेसह अवकाळी पावसात दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास शेतात लिंबाच्या झाडाला बांधलेल्या म्हशीवर वीज कोसळून म्हैस दगावली ची घटना घडली आहे, तर बाजूला थांबलेला पशु मालक जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील शेतकरी महादेव वसंत मोहिते यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला बांधलेल्या म्हशीवर आज दिनांक 20 एप्रिल वीज कोसळून ठार झाली आहे, ही म्हैस गाभण असून यात शेतकरी महादेव मोहिते यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले, तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने या घटनेची दखल घेऊन पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
0 Comments