Hot Posts

6/recent/ticker-posts

लाईनमनला मारहाण करणारे आरोपीला दोन वर्षे कारावास जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

लाईनमनला मारहाण करणारे आरोपीला दोन वर्षे कारावास

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल


धुळे : थकीत वीज बिल वसुली करण्यास गेलेल्या लाईनमन व कर्मचाऱ्यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी येथील तदर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल डी होली यांनी आरोपीला दोन वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

धुळे जिल्ह्यातील शहादा येथे दिनांक 22 मार्च 2019 रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास डोंगरगाव रोडवरील स्वामीनारायण मंदिराजवळ मनोहर हरिश्चंद्र इंदाईत यांच्या घराचे विद्युत पुरवठ्याची वीज बिल थकीत असल्याने विज बिल वसुलीसाठी लाईनमन स्वप्निल बागले राजेश खैरनार व प्रवीण बोरसे कर्मचारी केली असता त्यांनी विज बिल भरण्यास मनोहर इंदाईत यांनी नकार दिल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी यातील साक्षीदार फोनवर चढली असता मनोहर इंदाईत याचा राग आला रागाच्या भरात मनोहर इंदाईत यांनी लाईनमन स्वप्निल बागले यांच्यासह राजेश खैरनार व प्रवीण बोरसे यांच्या अंगावर धावून जात त्यांना आता बुक्क्यांनी मारहाण केली तसेच साक्षीदार राजेश खैरनार यांचा मोबाईल हिसकावून फेकून दिला त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला तसेच काठीने मारहाण करून जमिनीवर पडलेल्या विटांच्या तुकड्याने फिर्यादी व साक्षीदारांना मारून दुखापती केल्या शहादा पोलिसात पोलीस स्वप्निल बागले यांच्या फिर्यादीवरून मनोर हरिश्चंद्र इंदाईत यांच्याविरुद्ध कलम 353 332 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डीजे बडगुजर यांनी करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सदर खटल्याचे सुनावणीचे काम येथील तदर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एलडी होली यांच्या न्यायालयात होऊन यात फिर्यादी सह पाच महत्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या साक्षीदारांच्या साक्षीवरून गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी मनोहर हरिश्चंद्र इंदाईत याला न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 353 अंतर्गत दोन वर्षे व एक हजार रुपये दंड 332 कलमाने दोन वर्षे व एक हजार रुपये दंड 504 अंतर्गत दोन वर्षे व एक हजार रुपये दंड सर्व शिक्षा एकत्रित भोगायचे आहेत दंड न भरल्यास दोन महिने सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट आर पी गावीत काम पाहिले.

Post a Comment

0 Comments