एसी बसवताना विजेचा शॉक लागून तरुण जागीच ठार
शिर्डी : शिर्डीत वातान कुलीत यंत्र एसी बसविताना विजेचा शॉक लागून 21 वर्षीय अभय पोटी या युवकाचा मृत्यू झाला या घटनेची तक्रार वडील संजय बाबुराव पोटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . याबाबत शिर्डी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की कोपरगाव येथे तुषार थोडे व संजय होडे यांच्या एसी दुरुस्ती शॉप मध्ये अभय संजय कोठे व 21 राहणार निवारा तालुका कोपरगाव हा कामास आहे दिनांक 11 मे 2024 रोजी अभय हा कोडे बंधूंच्या दुकानात गेला होता. तेव्हा त्यांनी शिर्डी येथे कॉम्प्लेक्स मध्येच नवीन एसी बसविण्यासाठी कामास पाठवले. दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उच्च दाबाच्या विजेच्या धक्का बसून तो खाली पडला यावेळी दुकान मालक खोडे बंधू यांनी त्यास विचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ भरती केली होती समजतात वडील संजय पोटे हे तातडीने आपल्या सहकाऱ्यासह रुग्णाला दाखल झाले.
मात्र मुलगा मृत झाला असल्याची धक्कादायक माहिती त्यांना समजली शवविच्छेदन आणि अंत्यविधीनंतर शिर्डी येथे येऊन संजय पोटे यांनी पोलिसात फिर्यादी दिली. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्याच्या महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणासह तुषार होडी व सुरज होडी दोघे राहणार राम मंदिराजवळ कोपरगाव आणि आणखी एक अनोखाली संशयित अशा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी हे करत आहे.
0 Comments