तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील तरुणाचे अपहरण करून शेकापूर शिवारात खून
धाराशिव : पंढरपूरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने बसवंतवाडी येथील एका तरुणास डोक्यात लाकडाने मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत गुरुवारी देण्यात आलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील आरोपी रमेश पांडुरंग भोसले यांनी गावातीलच राजेंद्र शामराव बोबडे वय 35 या तरुणाला पंढरपूरला घेऊन जाण्याची थाप मारली या बहाण्याने त्यांनी 19 एप्रिल रोजी राजेंद्र याला शेकापूर शिवारातील साठवन तलावाजवळ आणून जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडाने डोक्यात प्रहार केले. जखमी अवस्थेत राजेंद्र खाली पडल्यानंतर त्याच्याकडील 18 हजार रुपये काढून घेत आरोपीने तिथून पोबारा केला .
या घटनेनंतर जखमी राजेंद्र यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते दरम्यान पाच मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. भाताची चौकशी करीत असताना हा प्रकार खुण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 16 मे रोजी समाधान प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात आरोपी रमेश भोसले यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments