नळदुर्ग येथील किल्ल्यातील उपली बुरुजावरून पडून नवविहातीचा मृत्यु, आठ दिवसांपूर्वीच झाला होता विवाह
तुळजापूर : नळदुर्ग येथील किल्ला पाहण्यासाठी आलेल्या नवविवाहितेचा किल्ल्यातील उपळी बुर्जावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 27 मे रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की हंगरगा (तूळ) ता. तुळजापूर येथील अमीर शेख हे आपली पत्नी व दोन नातेवाईकांसह किल्ला पाहण्यासाठी किल्ल्यात आले होते. अमीर शेख व त्याची पत्नी निलोफर शेख वय (22) हे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यातील सर्वात उंच असणाऱ्या उपळी बुरुजावर गेले या ठिकाणी उपळी बुरुजावर गेल्यानंतर बुरुजावरून किल्ला पाहत असताना नवविवाहित निलोफर शेख या बुरुजाच्या कडेला गेल्यानंतर त्यांचा तोल जाऊन त्या बुरुजावरून खाली पडून गंभीर जखमी झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पती अमीर शेख व इतर दोन नातेवाईकही बुरजावर होते. घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी असणाऱ्या युनिटी मल्टीकल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व नातेवाईकांनी किल्ल्यात असणाऱ्या वाहनांमधून गंभीर जखमी झालेल्या नवविवाहितेला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र नळदुर्ग येथील रुग्णालयात नेण्यापूर्वीच निलोफरचा दुर्दैव मृत्यू झाला .आठ दिवसापूर्वी लग्न झालेल्या निलोफरचा किल्ल्यातील बुर्जावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळूहळू व्यक्त केली जात आहे. पुरातत्व विभागाच्या गलथान कारभाराचा बळी आहे काही महिन्यापूर्वी उपळी बुर्जावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किंवा पर्यटक बुर्जावरून खाली पडू नये यासाठी उपळी बुरुजावर युनिटी मल्टी कॉस कडून सुरक्षेच्या उपायोजना करण्यात येत होत्या .मात्र पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी त्यांना हे काम करू दिले नाही . पुरातत्व विभागाने हे काम करू दिले असते तर आजची दुर्दैवी घटना घडली नसती. त्यामुळे पुरातत्व विभागाने भविष्यात अशी घटना घडून पर्यटकांच्या मृत्यू होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. जोराचा वारा सुटला तर उपळी बुरुजावर पर्यटकांना थांबताच येत नाही त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांसाठी सुरक्षा असणे गरजेचे आहे त्यामुळे पुरातत्त्व विभागाने तात्काळ या उपळी बुरुजावर सुरक्षेच्या दृष्टीने उपयोजना करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
0 Comments