Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात होतेय फरपट,खासगी शाळेमध्ये मुलांना दाखल करण्याचा पालकांचा वाढला कल

ग्रामीण भागातील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात होतेय फरपट,खासगी शाळेमध्ये मुलांना दाखल करण्याचा पालकांचा वाढला कल


धाराशिव : ग्रामीण भागातील पालकांचा खाजगी इंग्रजी शाळेमध्ये मुलांना दाखल करण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे शासकीय अनुदानित अंशतः अनुदानित शाळा विद्यार्थ्यांविना अडचणीत सापडले आहेत. विद्यार्थी शोधासाठी शिक्षकांना उन्हातान्हात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे.

एकेकाळी जिल्हा परिषद शाळा मुळे गावागावात शिक्षणाचा प्रसार झाला मात्र त्याच शाळांसमोर अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शाळेतील शिक्षक आता गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत अनेक पालकांनी इंग्रजी शाळेत विद्यार्थ्याला दाखल करण्यासाठी संबंधित शाळेतून दाखला काढण्यासाठी अर्ज दाखल केली आहे .तर असेच चालू राहिल्यास शाळेसमोर तुकडी टिकून ठेवण्याचा प्रश्न निर्माण होईल. ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे जिल्हा परिषदेच्या शाळांची वाटचाल ही डिजिटल कडेही होत आहे अशी असता काही अविद्यार्थ्यांच्याशाळांना विद्यार्थीच मिळत नाही. त्यामुळे सध्या शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात फरफट होत असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments