कृषी वार्ता: १ ऑगस्ट पासून खरीप ई पीक पाहणीला सुरुवात, राज्यात 142 लाख हेक्टर खरिपाचा पेरा|Farmers news: Kharif e crop inspection

Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी वार्ता: १ ऑगस्ट पासून खरीप ई पीक पाहणीला सुरुवात, राज्यात 142 लाख हेक्टर खरिपाचा पेरा|Farmers news: Kharif e crop inspection

कृषी वार्ता: १ ऑगस्ट पासून खरीप ई पीक पाहणीला सुरुवात, राज्यात 142 लाख हेक्टर खरिपाचा पेरा 


पुणे : राज्यात चालू खरीप हंगामासाठी भ्रमणध्वनी द्वारे ई पीक पाहणीची सुविधा सर्व शेतकऱ्यांसाठी येथे एक ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे. राज्यात सरासरी 142 लाख हेक्टरवर खरीप हंगाम घेतला जातो यापैकी यंदा 15 जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी 123 लाख हेक्टरच्या (८७℅) पुढे पेरा पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत पेरा 81 टक्के पूर्ण झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू खरिपात पेरण्याची गती चांगली आहे पेरण्यानंतरची विविध पिकाच्या रोप उगवणी बाबत किंवा वाढीच्या अवस्था विषयी कोणत्याही तालुक्यातून अद्याप तक्रार आलेली नाही.

राज्यात पाऊस देखील चांगला झालेला आहे एक जून ते 15 जुलै दरम्यान राज्यात सरासरी 367 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो परंतु यंदा याच कालावधीत 410 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 111 टक्क्यांच्या पुढे पाऊस झालेला आहे. त्यामुळे भाताची पुनर लागवड वगळता इतर बहुतेक खरीप पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपले आहेत.

ई पीक पाहणीची जबाबदारी भूमी अभिलेख आयुक्तालयाकडे आहे त्याविषयीच्या नियोजनाचा आढावा अलीकडेच आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह तसेच ईपीक पाणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या चमूने घेतला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार शेतकरी स्तरावरील एक ऑगस्ट पासून सुरू झाल्यानंतर 45 दिवस चालू राहील 15 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या स्तरावरील पीक पाहणी समाप्त होईल. शासनाकडून शेतकऱ्यांना पुन्हा मुदतवाढ न मिळाल्यास तसेच लगेच 16 सप्टेंबर पासून तलाठी किंवा सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी सुरू होईल. तलाठी आपापल्या पातळीवरील पाहणींची कामे पुढील 30 दिवस म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंत चालू ठेवतील. केंद्राने देशभर डिजिटल क्रॉप सर्वे पद्धत चालू खरीपापासून केली आहे. तरी देखील राज्य शासनाने ई-पीक पाहणी राज्यस्तरीय पद्धत स्वतंत्रपणे राबवण्याचा निर्णय चालू ठेवला आहे. अर्थात दोन्ही पद्धतीच्या ही पिक पाहण्यासाठी वापरले जाणारे उपयोजन एप्लीकेशन एकच ठेवण्यात आली आहे. केंद्र शासनाची पीक पाहणी चालू आहे खरिपात राज्यातील केवळ 35 तालुक्या पूर्वी मर्यादित असेल इतर सर्व तालुक्यांमध्ये राज्य शासनाच्या जुन्या पद्धतीने नुसार ई -पिक पहाणी  होणार आहे.

Post a Comment

0 Comments