फेरफार नोंदीसाठी घेतली मंडळ अधिकाऱ्यांनी 44 हजाराची लाच ,मंडळ अधिकारीसह तलाठ्यावर गुन्हा दाखल
अहमदनगर : महापालिकेतील लाचेची घटना ताजी असतानाच सावेडी तलाठी कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे .भूखंड विभागाची सातबारा नोंद करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून सावेडी तलाठी कार्यालयातील महिला मंडळ अधिकाऱ्याने 44 हजार रुपयांची लाच घेतली नंतर तलाठ्यानेही ऑनलाईन नोंदणीसाठी तेवढ्याच रकमेची मागणी करत तडजोडीअंती 40 हजार रुपये घेण्याची मान्य केली होते. मात्र संशय आल्याने तलाठी ने फोन बंद केला या प्रकरणी दोघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सावेडी तलाठी कार्यालयातील सामान्याची अडवणूक केली जात असल्याचीही अनेक तक्रारी आहेत.
सावेडी मंडळ अधिकारी शैलेजा राजाभाऊ देवकते व तलाठी सागर एकनाथ भापकर असे गुन्हा दाखल झाले यांची नावे आहेत .तक्रारदार यांचा सावेडी उपनगरात 18 हजार चौरस फुटाचा भूखंड होता त्यांच्या बांधकामासाठी 22 उपविभाग केले उपविभागाची सातबारा वर नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये सावडी तलाठी कार्यालयातील तलाठी भापकर यांच्याकडे दिला होता परंतु तलाठी भापकर यांनी काम करून देण्यास टाळाटाळ केली त्यात कागदपत्रे हरवल्याचे सांगून भापकर यांनी तक्रारदार यांच्याकडून पुन्हा कागदपत्रे मागवली व मंडळ अधिकारी देवकाते यांना भेटून घेण्यास सांगितले., त्यानुसार तक्रारदारांनी देवकते यांची भेट घेतली असता त्यांनी प्रत्येक उपविभागासाठी दोन हजार रुपये याप्रमाणे 44 हजारांची मागणी केली ही रक्कम तक्रारदाराने देवकते यांना दिली त्यानंतर ऑनलाईन नोंदणीसाठी त्यांनी भापकर यांच्याकडे पाठपुरावा केला असता तेवढीच रक्कम मला द्यावी लागेल असे भापकर हे तक्रारदार यांना म्हणाले दरम्यान तक्रार यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार दिली पोलिसांनी सापळा रचला परंतु तलाठी भापकर या शंका आल्याने त्यांनी तक्रारदार यांचा फोन घेण्यास टाळाटाळ केली त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा मंडळाधिकारी देवकाते यांची भेट घेऊन तलाठी भापकर 44 हजार रुपये मागत आहेत असे सांगितले त्यावर भापकर यांनी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 11000 रुपये देऊन टाका अशी देवकाते तक्रारदार यांना म्हणाल्या त्यानंतर भापकर यांनी फोन न घेतल्याने तक्रारदार यांनी फिर्याद दिली.
तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल
तक्रारदार यांना 19 मार्च 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती तक्रार देऊन तीन महिन्याचा कालावधी उलटून गेला तीन महिन्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होण्यास तीन महिने विलंब का झाला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
देवकाते यांच्यावर दुसऱ्यांदा ट्रॅप
मंडळ अधिकारी देवकाते नालेगाव तलाठी कार्यालयात नियुक्तीस असताना त्यांच्यावर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता लाच घेतल्याचा देवकाते यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून तक्रारीनंतर तीन महिन्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे
पैसे ऐवजी सोन्याची लाच
शासकीय कामे करून देण्याच्या बदल्यात सावेडी तलाठी कार्यालयात पैसे ऐवजी सोन्याची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे सराफा दुकानातून सोने आणून दिल्यानंतरच फाईल पुढे सरकते असे एकाने नाव न छापण्याचे अटीवर सांगितले.
0 Comments