लातूर : मागील भांडणाच्या कारणावरून उदगीरात महिलेचा चाकूने भोसकुन खून
लातूर : मागील भांडणाच्या कारणावरून एका ५५ वर्षीय महिलेच्या पोटात चाकुने वार केले . या घटनेत सदर महिला गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ही घटना उदगीर शहरातील बसवेश्वर गल्लीत बुधवारी दि, 3 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.या प्रकरणी आरोपी विरोधात उदगीर शहर पोलीस ठाण्यात खनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मयत झालेल्या महिलेचे नाव शालुबाई चंद्रकांत अलमकेरे वय (55) राहणार बसवेश्वर गल्ली उदगीर अशी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार उदगीर शहरातील काळा मारुती मंदिराजवळ असलेल्या बसवेश्वर गल्लीत राहत असलेल्या शालुबाई चंद्रकांत अलमकेरे यांचे कुटुंबात त्यांच्याच भावकीतील असलेल्या आरोपी सुरेश अमृताप्पा अलमकेरे यांचा जुनावाद होता, या जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी दि, ३ रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास वादात भावकीतील आरोपी सुरेश अमृताप्पा अलमकेरे राहणार बसवेश्वर गल्ली उदगीर यांनी फिर्यादी भाग्यश्री सुरेश अलमकेरी यांना शिवीगाळ करून भांडण केले . यानंतर भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी सासू शालुबाई चंद्रकांत अलमकेरे वय (55) या त्यांच्या घरी झोपलेल्या असताना आरोपीने चाकूने त्यांच्या पोटात वार करून गंभीर जखमी केली यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णाला दाखल केले परंतु रात्री दहा वाजता सुमारास त्यांचा मृत्यू झाला यानंतर त्यांच्या पाठीवर दिनांक चार रोजी गुरुवारी सकाळी 11 वाजता माळेगाव येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रकरणी फिर्यादी भाग्यश्री सुरेश अलंकेरे राहणार बसवेश्वर गल्ली काळा मारुती मंदिरा जवळ उदगीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 190/24 कलम 103 (1)352 बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करत आहेत.
0 Comments