Hot Posts

6/recent/ticker-posts

बैलपोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरेदीचा उत्साह-Bailpola San

बैलपोळ्याच्या खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी, यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरेदीचा उत्साह

धाराशिव - शेतात राहणाऱ्या बैलांचा सण म्हणून ग्रामीण भागात बैलपोळा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सण हा पोळा असतो पोळा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शहरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बैल सजावटीचे साहित्य आल्याने बाजार विविध साहित्याने भरल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेती मशागतीची बैलांची जागा ट्रॅक्टर घेतली असली तरी शेतकऱ्यांचे बैलावरचे प्रेम अपार आहे त्यामुळे अनदुर ईटकळ नळदृग जळकोट तुळजापूर आदी परिसरातील बाजारपेठा श्रावणी बैलपोळ्याच्या निमित्ताने सजले आहे. यंदा जिल्ह्यात सर्वजूर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा समाधानी आहे त्यामुळे आपल्या लाडक्या सर्जा राजासाठी आकर्षक साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांमधून उत्साहाचे वातावरण दिसून आले.

डोंगर माळ सुताचे कासरे शेंब्या पितळी तोडे गोंडे घुंगरू मोरखी घाटी सरजोडी गोंडे, हिंगोली यासह विविध आकर्षक साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची परिसरातील आठवडी बाजाराच्या दिवशी लगबग दिसून आली यावर्षी बैल सजावटच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले वर्षभर शेतात राबणारे आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी विविध साहित्य खरेदीसाठी शेतकरी कसलाही विचार न करता सजावट साहित्य खरेदी करताना दिसून आले.

यंदा खरीप हंगाम जोरात असून जनावरांचा हिरवा चारा मुबलक उपलब्ध आहे त्यामुळे यंदा पोळ्यांचा सण जल्लोष साजरा करण्याची तयारी शेतकऱ्याकडून केली आहे दरवर्षी श्रावणी पोळ्यानिमित्त काही सदन शेतकऱ्यांच्या बैलाच्या अंगावर दिसून येणाऱ्या महागड्या झोली आता मात्र नजर आड झाले आहेत. बैल शेती ऐवजी ट्रॅक्टर शेतीला शेतकऱ्यांची पसंती असल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे महागड्या झुली आता बाजारातून गायब झाले आहेत.तसेच पोळ्याच्या सणापूर्तीच बैलांची खरेदी करणारेदेखील काही शोकीन कमी नाहीत.

यंदा पाऊस पाणी चांगला असल्याने खरेदीचा शेतकरी मधील उत्साह

यावर्षी परिसरात समाधानकारक पाऊस पाणी झाली असून डोंगरदऱ्यात जनावरांसाठी चारा प्रमाणात उपलब्ध झाला आहे पोळ्याचा सण महत्त्वाचा सण आहे जनावरांना सजवण्यासाठी सजावटीचे साहित्य खरेदी करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी पेक्षा या वर्षी वेळेत पाऊस पडला असून पीक पाणी चांगले बहरले आहेत मूग उडीद सोयाबीन तूर आधी पिके जोमात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या भरोशावर शेतकरी आपल्या सर्जा राजाचा सर जोरात साजरा करत असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments