Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्यातील एक लाख मुली महिला बेपत्ता झाल्याच्या तपास तात्काळ करण्यात यावा व बदलापूर येथील पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी जलद गती न्यायालयात प्रकरण चालवण्यात यावे या मागणीसाठी आमआदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन

महाराष्ट्र राज्यातील एक लाख मुली महिला बेपत्ता झाल्याच्या तपास तात्काळ करण्यात यावा व बदलापूर येथील पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी जलद गती न्यायालयात प्रकरण चालवण्यात यावे या मागणीसाठी आमआदमी पार्टीचे जिल्हा  उपाध्यक्ष मधुकर शेळके यांचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन

 


धाराशिव: राज्यातील एक लाख मुली व महिला बेपत्ता झाल्याबाबत तात्काळ तपास करण्यात यावा व बदलापूर येथील पिढीतील न्याय मिळवून देण्यासाठी जलद गती न्यायालयात हे प्रकरण चालवण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे दिनांक 24 रोजी केली आहे.

या निवेदनात असे नमूद केले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मुली व महिला बेपत्ता झालेले आहेत त्याबाबत महाराष्ट्र सरकारने आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यांमध्ये मुली आणि महिला बेपत्ता झाले आहेत. यासाठी राज्य सरकारने कोणत्या उपाययोजना केले आहेत तसेच महाराष्ट्र राज्यातील मुली आणि महिला यांच्या सुरक्षा व्यवस्था संदर्भात काय नियोजन केले आहे राज्यात वारंवार अशा घटना मोठ्या प्रमाणात राज्याच्या विविध भागात होत आहेत सर्वसामान्य नागरिक वरील घटनेमुळे भयभित आहेत व अशुरक्षितची भावना निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्यातील मुली आणि महिला यांच्या सुरक्षा व्यवस्थाच ठेवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे बदलापूर येथील दोन छोट्या मुलीवर नराधमांकडून जो अत्याचार झाला आहे त्याबाबत पिढीतील न्याय मिळवून देण्यासाठी सदरील प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे व तिच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी याबाबत तात्काळ राज्याची गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी संबंधित आदेश देण्यात यावे अशी मागणी धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री मधुकर बबनराव शेळके यांनी माननीय तहसीलदार तुळजापूर यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे .बदलापूर येथील पीडित दोन छोट्या मुलीला राज्य सरकार यांनी योग्य तो न्याय द्यावा राज्यांमध्ये मुली आणि महिला बेपत्ता झाली आहेत त्याबाबत आपल्या माध्यमातून राज्य सरकार कोणकोणत्या उपाययोजना करणार करण्यात येणार आहेत यापुढे मुली व महिला यांच्या सुरक्षा व्यवस्थासाठी योग्य ठेवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे याबाबत आपल्या माध्यमातून योग्य व तात्काळ निर्णय  घ्यावा असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर शहराध्यक्ष किरण यादव, प्रशांत इंगळे यांच्या स्वाक्षरी आहेत.


Post a Comment

0 Comments