उपचाराच्या नावाखाली दोन भोंदुनी प्राध्यापकाला घातला चार लाखाचा गंडा, पांढरे डाग नष्ट करतो म्हणून अघोरी उपचाराचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर: अंगावरील पांढऱ्या डागावर उपचार करतो अशी थाप मारून दोन बंधूंनी प्राध्यापकाला तीन लाख 99 हजार रुपयांचा चुना लावला होता विशेष म्हणजे घरी येऊन अंगावर सुया टोचून पांढरा द्रव बाहेर काढून दाखवला उपचाराच्या मोबदल्यात ऑनलाईन पैसे वसूल केले मात्र डाग काही गेले नाही त्यावरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान सायबर पोलिसांनी राजा शेख महमूद शेख आणि मोहम्मद रंजीत मोहम्मद सलीम या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत तर त्यांचे साथीदार मोहम्मद नासिर आणि असलम शेख मुबारक यांना धुळे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन रक्कम जप्त केली आहे.
फिर्यादी प्राध्यापक नंदकुमार राठी यांनी भोंदुनी अंगावर पांढरे डाग काढण्यावर खान डॉक्टर पूर्णपणे आयुर्वेदिक उपचार करतात अशी थाप मारून राठी यांचा मोबाईल नंबर घेऊन गेला त्यानंतर त्यांनी राखी यांना संपर्क करून त्यांच्या घरी आला राठी यांच्या अंगावर सुया टोचून पांढरा द्रव बाहेर काढून दाखवला त्यांची फीस म्हणून तीन लाख 99 हजार रुपये बँकेत जमा करण्यास सांगितले त्यानुसार राठी यांनी ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवले मात्र त्यानंतरही अंगावरील डाग काही गेले नाही म्हणून राखी यांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी आणखी एका आयुर्वेदिक औषध खरेदी करण्यास भाग पाडले तरीही डाग गेले नाहीत म्हणून डॉक्टर खान याला राठी यांनी संपर्क केला तेव्हा त्यांनी उत्तरे दिली त्यामुळे फसवणूक झाल्याने राठी यांनी सायबर पोलिसात ठाण्यात शनिवारी महिन्यात तक्रार दाखल केली सायबर पोलिसांनी सापळा रचून शेख राजा आणि मोहम्मद रंजीत या दोघांना बेड्या ठोकल्या त्यांच्या चौकशीत नसेल आणि असलम यांची नावे समोर आली आहेत त्यांना धुळे पोलिसांच्या मदतीने सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्राध्यापकाला चार लाखाची रक्कम परत
पोलिसांना आरोपीकडून फसवणूक झालेली तीन लाख 99 हजार रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली न्यायालयाचे आदेशाने नंदकुमार राठी यांना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते रक्कम परत करण्यात आली राठी यांनी पोलिसाची आभार मानले. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त प्रशांत स्वामी सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर चे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर उपनिरीक्षक कैलास अंदलदास शिपाई सुशांत शेळके तळवंडी सोनटक्के उगले काळे पाटील चौधरी आणि कुराडे यांनी केली.
0 Comments