घरकुलासाठी २ हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात, घरकुलाचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयास पाठवण्यासाठी घेतली लाच-
धाराशिव: घरकुलाचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयास पाठवण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच घेऊन आणखी तीन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या वडगाव काटी ता. तुळजापूर येथील ग्रामसेवकास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तुळजापूर पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचून ही कारवाई केली एसीबीच्या या कारवाईमुळे ग्रामसेवकाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत एसीबीने दिलेली अधिक माहिती अशी की तक्रारदार यांना शासकीय योजनेतून घरकुल हवे होते त्यासाठी त्यांनी वडगाव काटी येथील ग्रामसेवक सुभाष सिद्राम चौगुले राहणार बीबी दारफळ ता. उत्तर सोलापूर यांची भेट घेतली यावेळी ग्रामसेवक चौगुले यांनी घरकुल मिळवण्यासाठीचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय तुळजापूर येथे पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारली यानंतर देखील चौगुले तक्रारदार यांच्याकडे आणखी तीन हजार रुपयांची मागणी करीत होती तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाच लचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली त्या अनुषंगाने एससीबीची उपअधीक्षक सिद्धाराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने तुळजापूर येथे शुक्रवारी दिनांक २ रोजी सापळा रचला होता ;दरम्यान ग्रामसेवक चौगुले यांनी तक्रारदार यांच्याकडे यांचा पंचासमक्ष यापूर्वी दोन हजार रुपयाचे स्वीकारल्याचे मान्य केले तसेच आणखी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली .यावेळी एसीबीच्या पथकाने लाचखोर ग्रामसेवक चौगुले यास लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन तुळजापूर येथे लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे उपाधीक्षक श्री म्हैञे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम पोलीस अंमलदार आशिष पाटील सिद्धेश्वर तावस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली दरम्यान लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचीची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार द्यावी अशी आव्हान एसीबी चे उपाध्यक्ष सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले आहे.
0 Comments