जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत
धाराशिव: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा न्यायालय धाराशिव येथे व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे तडजोड पात्र फौजदारी खटले, मोटर अपघात, कौटुंबिक वाद ,धनादेश करणे ,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथील तडजोडीस पात्र प्रलंबित प्रकरणे तसेच मोटार वाहन भंगाची प्रकरणे यावर समेट घडवून आणला जाईल लोक अदालतचा जास्त लाभ घ्यावा असे आव्हान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे व प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.
0 Comments