Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव- श्रीपतराव भोसलेमध्ये विद्यार्थी महावाचन चळवळ -shripatrav bhosale high school students reading

धाराशिव- श्रीपतराव भोसलेमध्ये विद्यार्थी महावाचन चळवळ 

धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिवच्या वतीने 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या उपक्रमांतर्गत विद्यार्थी महावाचन चळवळ सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध लेखकांची पुस्तके, ग्रंथ, चरित्रे वाचायला देण्यात आली. या सत्रात विद्यार्थ्यांनी अवांतर करून एक वेगळाच आनंद व अनुभूती घेतली. वाचन करून झाल्यानंतर प्रत्येकाकडून लेखी स्वरूपात अभिप्राय मागवण्यात आले. या वाचन सत्रामध्ये कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले. 

या सत्रासाठी उपमुख्याध्यापक श्री. प्रमोद कदम सर, पर्यवेक्षक श्री. कोरडे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. डी. वाय. घोडके सर, ग्रंथपाल श्री. फंड सर, श्री. एस. एम. गोरे सर, श्री. के. बी. मोहिते सर, श्री. एल. एस. शिंदे सर, श्री. करडे सर आदींची खास उपस्थिती लाभली. 


या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले.

Post a Comment

0 Comments