उच्च शिक्षित दांपत्य शेतकऱ्यांनी दीड एकर पेरू लागवडीतून घेतले 24 लाख रुपये उत्पन्न
करमाळा: वाढते हवामान ,वाढती मजुरी , नेहमी पडणारे पिकाचे बाजारभाव यावर मात करणारे चित्र शेती व्यवसायामध्ये पाहण्यास मिळत आहे. मात्र करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील उच्च शिक्षक शेतकरी विजय जगदाळे व पत्नी प्रियंका या दाम्पत्याने जिद्द, चिकाटी , मेहनतीच्या बळावर आपल्या दीड एकर क्षेत्रावरील शेतीमध्ये तैवान पेरू लागवडीतून पहिल्याच वर्षी 24 लाख 20 हजार रुपयाचे भरघोश उत्पादन घेतले आहे. वाशिंबे गाव हे उजनी धरण लाभ क्षेत्रात असल्याने या परिसरात ऊस व केळी हे मुख्य पीक घेतले जाते ;परंतु वारंवार उसाचे एकच पीक घेतल्याने उत्पादनात होणारी घट पिकासाठी लागणारा जास्तीचा कालावधी खतांचा वाढलेला खर्च गाळपसाठी होणारा त्रास त्यामुळे जगदाळे यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत पेरू लागवडीचा निर्णय घेतला.
मार्च 2023 मध्ये तैवान या पिंक या जातीच्या पंधराशे पन्नास रोपांची दीड एकर क्षेत्रावर दोन ओळीत आठ फूट व दोन रोपात पाच फूट अंतर ठेवून शेणखत व रासायनिक खत वापरून लागवड केली . पेरूला बाजारपेठेत प्रत्येक लोक 50 ते 85 रुपये भाव मिळाला लागवडीपासून विक्रीपर्यंत पाच लाख 50 हजार रुपये खर्च आला, 18 महिन्यात विक्रीसाठी आलेल्या पेरूची शेताच्या बांधावरच पन्नास रुपये ते 45 रुपये प्रति किलो दराने मुंबई पुणे येथील व्यापाऱ्यांना मालाची विक्री केली. एकूण 36 टन मालाच्या विक्रीतून 24 लाख 20 हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे केळी, कलिंगड, उसाचे पीक व्यवस्थापनाचा इतरांना लाभ रोगापासून पेरूची संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर व प्लॅस्टिक बॅगचा वापर केला .त्यामुळे गुणवत्ता व दर्जा चांगला राखण्यात यश मिळाले आहे जगदाळे यांनी आतापर्यंत आपल्या शेतात केळी कलिंगड ऊस याचे भरघोस उत्पादन घेतले आहे; योग्य व्यवस्थापन व कमी कालावधीत घेतलेली भरघोस उत्पन्न त्यामुळे त्यांची शेती परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असून आपल्या शेतात माहितीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पिकातील बारकावे सांगत आहेत
पेरूच्या फळबागेसाठी जीवामृत ठरले वरदान
देशी गाईचे शेण गोमूत्र गूळ कडधान्याचे पीठ यांचे प्रमाणानुसार व्यवस्थित मिश्रण करून वस्त्रगाळ करून दर आठ दिवसाला झाडांना ठिबकच्या साह्याने झाडांना दिले ..जीवामृतामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूची संख्या सेंद्रिय कर्ब जमिनीतील कार्बन वाढवण्यास मदत झाली त्यामुळे झाडांचे रोगप्रतिकारशक्ती वाढवून झाडाची योग्य वाढ फुलांचे प्रमाण व पर्यायाने उत्पादनात वाढ झाली तसेच दीड एकर बागेला सहा ट्रॉली शेणाचा वापर केला. तसेच बारामती पुणे येथील कृषी मेळाव्याला उपस्थित राहून व यशस्वी पेरू बागायतदारांच्या प्लांटला भेट देऊन त्यातील बारकावे जाणून पेरू लागवडीचा निर्णय घेतला. बाजारपेठेचा अंदाज घेत फळ छाटणी करून बहर घेत पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न निघाले.
विजय जगदाळे शेतकरी ,वाशिंबे ता. करमाळा
0 Comments