श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रा. विलास जगदाळे यांचे व्याख्यान
धाराशिव: येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक गुरुवर्य कै. के. टी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आदर्श संस्थेच्या वतीने ३ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर हा सप्ताह विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेले प्रा. श्री. विलास जगदाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. व्याख्यानात श्री. जगदाळे यांनी सर्वप्रथम गुरुवर्य कै. के. टी. पाटील बप्पा यांच्या प्रेरणादायी शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या जीवनात आई वडील व गुरुजनांचे स्थान काय असते हे त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणातून सांगितले. गुरु म्हणून आईचे स्थान काय असते, गुरुजनांचे स्थान काय असते हे सांगत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, कवी माधव जुलियन पासून ते अलेक्झांडर दि ग्रेट पर्यंतचे दाखले दिले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये दातृत्व गुण असावा हे सांगण्यासाठी त्यांनी राजा रंजीतसिंहाचे देखील उदाहरण दिले. आजच्या विद्यार्थ्याला लागलेले सर्वात मोठे व्यसन म्हणजे मोबाईल आहे. त्या व्यसनामुळे आपलं बरंच आयुष्य खाल्लं गेलं आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे व आपल्या ध्येयासाठी जगावे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर होते. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी फोटॉन बॅच प्रमुख श्री. अरविंद भगत सर, फेनॉमेनॉल बॅच प्रमुख श्री. जे. एस. पाटील सर, प्राध्यापक श्री. एस. के. कापसे सर प्राध्यापक श्री. पी. ए. गर्जे सर आदींचीही विशेष उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. श्री. डी. व्ही. जाधव सर यांनी केले तर प्रा. श्री. एस. के. कापसे सर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले.
0 Comments