पीएम किसान योजना : नंबर दुरुस्तीस 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ नोंदणी केलेले चुकीचे भ्रमणध्वनी क्रमांक दुरुस्त करुन घेण्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन
धाराशिव दि.७ : शेतकऱ्यांना आधार मिळण्यासाठी पी.एम.किसान योजना सुरु करण्यात आली आहे.मात्र,पोर्टलवर डाटा अपलोड करताना चुकीचे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.राज्य शासनाने अशा प्रकारच्या मोबाईल क्रमांकामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. नोंदणी केलेले भ्रमणध्वनी क्रमांक दुरुस्त करुन घ्यावे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
पी.एम.किसान योजनेसाठी नोंदणी करताना लाभार्थीनी त्यांचा आधार संलग्न मोबाईल नंबर नोंदणी करणे आवश्यक होते.या नोंदणीवेळी लाभार्थ्यांचा एक मोबाईल क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरण्यात आल्याचे ऑनलाईन पोर्टलवर दिसत आहे.या अनुषंगाने ज्या लाभार्थीचे मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदविण्यात आलेले आहेत.अशा लाभार्थीनी पी.एम.किसान पोर्टलवर Farmer Corner या पर्यायातील Update Mobile Number या सुविधेच्या माध्यमातून मोबाईल क्रमांकाची दुरुस्ती करण्यासाठी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आहे. लाभार्थी पी.एम. किसान पोर्टलवर पात्र असणे आवश्यक आहे.तसेच 15 सप्टेंबर 2024 नंतर ही सुविधा ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध राहणार नाही.
त्यामुळे ज्या पात्र लाभार्थी यांचा पी.एम.किसान पोर्टलवर मोबाईल क्रमांक चुकिचा अथवा इतर झालेला आहे,अशा लाभार्थीनी दुरुस्तीची कार्यवाही pmkisan.gov.in या पोर्टलवरील Framer corner या पर्यायाअंतर्गत Update Mobile Number हा पर्याय वापरुन मोबाईल क्रमांक बदलून घ्यावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
0 Comments