मराठवाडा मुक्ती संग्राम दिन :- इतिहास
शौर्यगाथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे हा उत्सव दरवर्षी 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो.
उगवली ती सोनेरी पहाट
अन मिटला अंधार युगायुगांचा
फडकला तिरंगा दिमाखाने अन्
मराठवाड्यांनीही सोहळा पाहिला स्वतंत्र्याच
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थांमध्ये विखुरलेला होता त्यावेळी भारतात लहान मोठी 565 संस्थानी होती पैकी 562 संस्थांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची समाधी दर्शवली ही संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली नाहीत.
स्वतंत्र तर इंग्रजी राजवट गेली पण तीन संस्थाने मात्र स्वतंत्र झाली नव्हती त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थांचा भाग होता आणि मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरुद्ध दीर्घ असा लढा द्यावा लागला तसेच अनेकांना या लढ्यात आपल्या जीवाची बलिदान द्यावी लागली देशाला स्वातंत्र्य मिळण्याचे आधीपासूनच मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला.
निजामाच्या अन्याय राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या भागात उभारण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली हैदराबाद संस्थानांमध्ये त्या काळात तेलंगणा सध्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्याचा काही भाग येत होता. हैदराबाद संस्थानाची त्या वेळची लोकसंख्या तब्बल एक कोटी 60 लाख एवढी होती. मुक्ततीसाठी लढा सुरू असताना रजाकाराचे जनतेवर अत्याचार करणे सुरूच होते मात्र स्वामी रामानंद तीर्थ गोविंद भाई श्रॉफ दिगंबरराव बिंदू रवी नारायण रेड्डी भाऊसाहेब वैश्यपायन चव्हाण बाबासाहेब परांजपे शंकरसिंह नाईक विजेंद्र काबरा यासारख्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहोचला.
1938 ते 1948 हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा प्रमुख कालखंड म्हणून ओळखला जातो याच काळात मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी वेगवेगळी राजकीय आंदोलने विद्यार्थी चळवळी इतकेच नाही तर सशस्त्र आंदोलन देखील झाली हा विरोध मोडून काढण्यासाठी हैदराबादच्या निजाम आणि काशिम रजवी यांच्या मतीने रजाकार संघटनेची स्थापना केली आणि मराठवाड्यातील जनतेवर अत्याचार करायला सुरुवात केली निजामाने या रजाकार संघटनेचा वापर करून संस्थानातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा निजामाचा स्वतःची राज्य टिकवण्याचा निषफळ प्रयत्न होता 15 ऑगस्ट 1947 स*** भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर मराठवाड्यातील जनतेच्या विरोधाला आणखीन चलना मिळाली.
यातच निजामाच्या हुकूमशाही राजवटीला उघड उघड आव्हान म्हणून 7 ऑगस्ट रोजी भारतीय संघराज्यात सामील होण्याचा दिवस आणि 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याची आव्हान करण्यात आले या वाहनाला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर वेगवेगळ्या आव्हानाला कृती कार्यक्रम हाती घेऊन निजामाच्या सत्तेची पाळीमुळे खणून काढण्यास सुरुवात केली. सात सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थानावर पोलीस बळाचा वापर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 17 सप्टेंबरला निजामाने माघार घेतली तो सरकारला शरण आला. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी करून मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्याय राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात मराठवाडा भाषेच्या आधारे महाराष्ट्रात सामील करण्यात आला संयुक्त महाराष्ट्र निर्मिती देखील मराठवाड्यातील जनतेने मोठे योगदान दिले.
त्यानंतर एक मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मराठवाडा हा संत साहित्यिक आणि सुधारकांची भूमी राहिला आहे केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताच्या घटनेत मराठवाड्याची योगदान मोठी आहे. देशासाठी राष्ट्रीय स्तरावरचे राजकीय नेतृत्व मराठवाड्यातूनच मिळाली आहे हा मराठवाड्याचा उज्वल इतिहास आहे आजचे वर्तमानपत्र विचारात घेऊन भविष्य घडवण्याची क्षमता मराठवाडी माणसात नक्कीच आहे त्यासाठी काय करता येईल याचा विचार आपण मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने केला पाहिजे.
0 Comments