Hot Posts

6/recent/ticker-posts

तब्बल नऊ वर्षानंतर एसटी महामंडळ प्रथमच नफ्यात ऑगस्टमध्ये 31 पैकी 20 विभागात भरघोस महसूल

तब्बल नऊ वर्षानंतर एसटी महामंडळ प्रथमच नफ्यात ऑगस्टमध्ये 31 पैकी 20 विभागात भरघोस महसूल


मुंबई : गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला सुगीचे दिवस सुरू झाले असून एसटीची आर्थिक घोडदौड चालू आहे ऑगस्ट महिन्यात 31 विभागापैकी 20 विभागाने नफा कमवला आहे या महिन्यात एसटी महामंडळाचा 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये इतका नफा झालेला आहे. तब्बल नऊ वर्षांनी ऑगस्ट 2024 मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आली आहे.

दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्यापाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या डबघाईला आली होती एसटी बंद पडते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली तथापि एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळवणे हे मोठे आव्हान होत यावेळी राज्य शासनाने 75 वर्षांवरील जेष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास व सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50 टक्के सवलत या दोन योजना सुरू केले की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली सध्या सरासरी 54 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करीत आहेत याबरोबरच एसटीने प्रशासनाने गेल्या वर्षभरात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान  विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास प्रवासी राजा दिन कामगार पालक दिन श्रावणात एसटी संगे तीर्थस्थान असे अनेक अभिनव उपक्रम राबवले आहे.

तसेच जे विभाग गेली कित्येक वर्षे तोट्यामध्ये आहेत त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली. स्थानिक पातळीवर आगामी हा कर्मचारी व अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या दरम्यान भविष्यात येऊ घातलेल्या स्वतः मालकीच्या बसेस व भाडेतत्त्वावरील बसेस एसटीच्या ताब्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करून एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करून  त्यांची अंमलबजावणी केली जाईल जेणेकरून एसटीला गत वैभवी प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी व्यक्त केला आहे.

हे सकारात्मक बदल केले

तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून त्याच्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तेथे वळविण्यात आल्या याच बरोबर ना दुरुस्ती बसेसचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये निम्म्याने कमी करण्यात आले . 12 टक्क्यावरून सहा टक्क्यावर आले तसेच चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रबोधन करून डिझेलची खपत 0.52 किमी ने वाढवण्यात आले त्यामुळे डिझेलची बचत झाली आहे या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला 16 कोटी 86 लाख 61 हजार इतका नफा प्राप्त झालेला आहे.

Post a Comment

0 Comments