मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार
मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरुवात केली आहे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर लवरकच जमा होईल अशा बातम्या सोशल माध्यमांमध्ये झळकत होत्या. त्यामुळे महिलांना या योजनेची पैसे कधी भेटणार हे नक्की समजत नव्हते मात्र खात्यात पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख समोर आली आहे. या योजनेचे अधिकृत माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याची अधिकृत माहिती सांगितली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा निधी येणाऱ्या 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
0 Comments