उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने व रोगराईमुळे सोयाबीनसह अन्य पिकांचे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची सातालिंग स्वामी यांची मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे मागणी
धाराशिव :- अतिवृष्टी, बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव यामुळे उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक प्रकोपामुळे हिरावला असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी अशी मागणी दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष ( कॅबिनेटमंत्री दर्जा ) ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उमरगा लोहारा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीसह बुरशीजन्य व किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन, मूग, उडीद आदीसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. गत वीस ते पंचवीस दिवसापासून जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस होऊन अतिवृष्टी झालेली आहे. त्यातच बुरशीजन्य व कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक सोयाबीनसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडचा घास नैसर्गिक प्रकोपामुळे हिरावला गेला आहे. वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी कशी साजरी करायची इतकेच काय संपूर्ण वर्षाचे आर्थिक गणित कोसळल्याने काढलेले बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे. त्यातच मुलींच्या लग्नाची चिंताही सतावत असल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे.
जाहीर केलेल्या 4892 रुपये म्हणजेच सरासरी पाच हजार रुपये हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांचे सरासरी एकरी दहा क्विंटल उत्पन्न ग्राह्य धरले तर एकरी पन्नास हजार रुपये प्रमाणे हेक्टरी सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे शासनाने सारासार विचार करून हेक्टरी किमान एक लाख रुपये नुकसान भरपाई दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना दयावी व भविष्यात होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्यात अशी मागणी अशी मागणी दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष ( कॅबिनेटमंत्री दर्जा ) ओमप्रकाश उर्फ बच्चु ( भाऊ ) कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांनी मुंबई येथे दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांचा मंत्रालयामध्ये गत दहा वर्षापासून प्रशासकिय कामाचा अनुभव असल्याने व त्यांचा सर्वच विभागाच्या खात्यांशी व संबंधीत मंत्री, प्रशासनातले मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी यांचा जवळचा व सलोख्याचा संबंध असल्याने त्यांच्या मागणीची शासनाकडून व प्रशासनाकडून नक्कीच दखल घेऊन उमरगा लोहारा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांतून केली जात आहे.
0 Comments