पवनचक्कीच्या साइटवर दोन कामगारास बेदम मारहाण, तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी शिवारातील घटना
तुळजापूर -पवनचक्की उभारण्याच्या साईटवर अज्ञात व्यक्तीने दोन कामगारास बेदम मारहाण केल्याची घटना बसवंतवाडी शिवारात गुरुवारी दिनांक ५ रोजी रात्री घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की चिवरी येथील भागवत अण्णाराव देशमुख व कृष्णात संजय साखरे हे तरुण बसवंतवाडी शिवारातील रिन्यू पावर कंपनीच्या आर. एस. एल 24 या पवनचक्की साइटवर सुरक्षारक्षकाचे काम करत होते, गुरुवारी दिनांक ५ रोजी मध्यरात्री अज्ञात दहा ते पंधरा व्यक्तींनी येऊन हातपाय बांधून लाठ्या-काठ्यांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाली असून तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत अशी माहिती कंपनीचे अधिकारी विजय सावंत यांनी दिली. या थरारक घटनांमुळे कंपनी कामगारांसह स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिवरी येथील 30 ते 35 कामगार या पवनचक्की साइटवर काम करतात त्यामुळे कंपनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इतर कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने उपायोजना करण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थासह कामगाराकडुन होत आहे.दोन्ही कामगारांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारास पाठवण्यात आले आहे.या घटनेची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला दाखल करणार आहे. अशी माहिती कंपनीचे सुपरवायझर विजय सावंत यांनी दिली आहे.
0 Comments