धाराशिव: जिल्हयातील डेंग्यु रोगास प्रतीबंधात्मक उपाययोजना तात्काळ करा– खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर-omraje ninbalkar Dharashiv

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: जिल्हयातील डेंग्यु रोगास प्रतीबंधात्मक उपाययोजना तात्काळ करा– खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर-omraje ninbalkar Dharashiv

धाराशिव जिल्हयातील डेंग्यु रोगास प्रतीबंधात्मक उपाययोजना तात्काळ करा– खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर


धाराशिव : जिल्हयातील डेंग्यु रोगाचा प्रसार मोठया प्रमाणात झाला असल्याकारणाने रुग्णांचे प्रमाण जिल्हयाभरात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. डेंग्यु व डेंग्यु सदृष्य आजारामुळे जिल्हयातील अनेक नागरीक सातत्याने आजारी पडत आहेत. या साथ रोगास प्रतीबंधात्मक उपाययोजना करुन अटकाव करणे गरजेचे आहे. या संदर्भाने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना धाराशिव जिल्हयातील डेंग्यु रोगास प्रतीबंधात्मक उपाययोजना तात्काळ करणेबाबत पत्राव्दारे सुचीत केले आहे.

या पार्श्वभुमीवर उमरगा तालुक्यातील ओम साळुंके व सत्यजित देशमुख या दोन शालेय विद्यार्थ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. धाराशिव जिल्हयातील डेंग्यु साथ रोगास प्रतीबंधात्मक उपाय योजना करणेबाबत ‍मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, धाराशिव व जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा रुग्णालय धाराशिव यांना प्रतीबंधात्मक उपाययोजना करुन शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व गावोगावी औषध फवारणी तसेच इतर प्रतीबंधात्मक उपाययोजना करणेबाबत पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments