Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर विधानसभेत आम आदमी पार्टीची उडी तर उमरगा मध्ये लक्ष्मण काजळे यांची उमेदवारी अंतिम


तुळजापूर :आम आदमी पार्टी  धाराशिव  येथील जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आले होते..  आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात पंजाब दिल्ली गोवा आणि जम्मू-काश्मीर येथे मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्रातील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अशा पल्लवीत झाले आहेत.देशभरात आम आदमी पार्टीचे जवळपास 160.170आमदार आहेत. दिल्ली आणि पंजाब येथे पाणी विज आरोग्य शिक्षण आणि भ्रष्टाचार विरहित राज्यकारभार इत्यादी मूलभूत गरजावर काम करून यशस्वी झालेल्या आम आदमी पार्टीची पुढेही यशस्वी घोडदौड चालूच आहे .त्या अनुषंगाने धाराशिव येथे 2024 विधानसभेच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते .बैठकीमध्ये तुळजापूर विधानसभेसाठी तानाजी पिंपळे, मधुकर शेळके ,वसीम पठाण इत्यादी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येऊन अंतिम उमेदवार निवडीचे अधिकार वरिष्ठ च्याकडे पाठविण्यात  यावे असे बैठकीत ठरले..तसेच उस्मानाबाद कळंब,  आणि परंडा या विधानसभा सुद्धा लढवण्याचे संकेत यावेळी देण्यात आले. तुळजापूर विधानसभेमध्ये एक  प्रस्थापित मातब्बर  नेता आम आदमी पार्टीकडून इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे .. 

बघूया घोडा मैदान जवळच आहे ..लवकरच या संबंधित माहिती समोर येईल.. . 

   आम आदमी पार्टीमध्ये असणाऱ्या प्रमाणिक देशभक्त अशा कार्यकर्त्यामुळे भ्रष्टाचारी आणि प्रस्थापित नेत्यांना हे कार्यकर्ते जड जाण्याची शक्यता जलसामान्यातून वर्तवण्यात येत आहे.. 

बैठकीसाठी जिल्हा अध्यक्ष राहुल माकोडे  जिल्हा सचिव मुन्ना शेख जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपळे उपाध्यक्ष श्रीकांत भुतेकर जिल्हा उपाध्यक्ष राजपाल भैया देशमुख,चांद शेख, बिलाल रिझवी मुखतर चाचा, संजय काका दनाने, मधुकर शेळके, वसीम पठाण सुरेश शेळके राजेश चुंगे अंकुश भोसले आदी उपस्थित होत. 

Post a Comment

0 Comments