मुंबई: शिवसेना पक्षाच्या फुटी नंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे वेगवेगळे दसरा मेळावे होऊ लागली आहेत. यंदाचा ठाकरे गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा यंदाचा दसरा मेळावा निश्चित विराट आणि ऐतिहासिक ठरत आहे. यंदाच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरल आहे. तसेच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी आई तुळजाभवानीची ज्योत देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सन्मान केला आहे.
0 Comments