धाराशिव : खाजगी प्रवासी ट्रॅव्हलचे तिकीट दरावर सणासुदीच्या कालावधीमध्ये नियंत्रण ठेवण्यात यावे या मागणीसाठी धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
या निवेदनात असे म्हटले आहे की ,सणासुदीच्या सुट्टीच्या कालावधीत खाजगी ट्रॅव्हल्स टिकीट दरवाढ यावर नियंत्रण असावे बाबत आदमी पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री . मधुकर शेळके यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना तहसिलदार तुळजापूर मार्फत निवेदन सादर केले आहे यामध्ये त्यांनी "सणासुदीच्या व सुट्टीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना नातेवाईकांना मित्रांना त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबासमवेत इतर गावी नातलगांना भेटण्यास जावे लागते . तरी सदरील दिवाळी किंवा इतर सुट्ट्या या कालावधीचा सणासुदीचा सुट्टीचा फायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स वाले यांच्या तिकीट दरामध्ये या कालावधीचा फायदा घेऊन मनमानी करून मोठ्या प्रमाणात टिकीट दरवाढ करतात .
नाहक त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो . प्रवासाचे इतर साधने या अनुषंगाने खाजगी ट्रॅव्हल्स मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांची या कालावधी संख्या खूप मोठी आहे .सणासुदीच्या कालावधीमध्ये व सुट्ट्याच्या कालावधीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स तिकीट दरात दरवाढही शासकीय नियमाला धरून असावी त्यावर प्रशासनाचे नियंत्रण . दिवाळी तसेच उन्हाळी सुट्ट्या व सणासुदीच्या कालावधीमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स तिकीट दरावर जिल्हयात नियंत्रण असावे जेणेकरून जनतेवर त्या दर वाढीचा जास्त आर्थिक बोजा बसणार नाही व सणासुदीच्या कालावधीमध्ये सुट्टीला फिरण्याचा आनंद नागरिकांना सहकुटुंब आनंदाने घेता यावा . याबाबत निवेदनाद्वारे सदरील खाजगी प्रवासी वाहतुक ट्रॅव्हल्स यांच्या टिकीट दरांवर नियंत्रण असावे तसेच मनमानी करणाऱ्यावर आपल्या माध्यामातून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी विनंती करण्यात आली आहे त्याचप्रमाणे
खाजगी ट्रॅव्हल्स वाहतूक वाल्यांच्या मनमानी तिकीट दर वाढीवर अंकुश आणता येईल त्याचप्रमाणे ट्रॅव्हल्स मध्ये स्वच्छता साफसफाई बाबत पण सुधारणा व्हाव्यात जेणेकरून नारिकांचा प्रवास आनंददाई होईल त्या अनुषंगाने प्रशासनाने यंत्रणा कार्यरत करण्यात यावी याबाबत हि मागणी निवेदनाद्वारे श्री . मधुकर शेळके आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आप चे शहर अध्यक्ष श्री किरण यादव यांच्या वतीने करण्यात आली आहे.
0 Comments