धाराशिव : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि प्रश्नांमध्ये सुधारणा व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसाठीच्या पात्र महिला लाभार्थ्या आहेत परंतु त्यांची बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित आहेत अशा महिला लाभार्थ्यांनी बँक खाते आधार संलग्न करून घ्यावी यासाठी सर्व संबंधित बँकांमध्ये दि,७ व ८ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी जिल्ह्यातील योजनेस पात्र महिलांनी आपल्या आपल्या बँकेत जाऊन आपली बँक खाते आधार संलग्न करून घ्यावी जेणेकरून या योजनेचा लाभ मात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी मदत होईल अशी आव्हान जिल्हा प्रशासन केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाखो महिला प्रतिमहा दीड हजार रुपयाचा लाभ घेत आहेत मात्र दुसरीकडे अनेक महिला अशाही आहेत ज्यांना लाभ मंजूर आहे मात्र खात्यावर पैसे जमा होत नाहीत तक्रारी वाढल्यानंतर जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या मान्यतेने अप्पर जिल्हाधिकारी यादव यांनी 4 ऑक्टोबरला स्वतंत्र आदेश काढला आहे त्यानुसार दिनांक सात व आठ ऑक्टोबर अशी दोन दिवस सर्वच बँकांमध्ये विशेष कॅम्प ठेवण्यात आले आहेत महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी आव्हान करण्यात आले आहे.
0 Comments