⛔तुळजापूर /बिभिषन मिटकरी: आगामी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवणाऱ्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांना वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवण्याची उमेदवारी मिळाली आहे.
राज्यात वंचित बहुजन आघाडीने विविध अठरा पगड जाती-धर्माच्या उमेदवारांना वेळोवेळी संधी दिलेली आहे. यातच वंचित कडून आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून डॉ: स्नेहा सोनकाटे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्या अनुषंगाने त्यांना विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देण्यात यावी असे आव्हान मतदार संघातील नागरिकांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव धाराशिव आर एस गायकवाड यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक क्रांती पाठोपाठ नेहमी राजकीय क्रांती येत असते.आणि म्हणूनच श्रद्धेय अँड बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी बहुजनातील सर्वच समाजाला उमेदवारी देवून त्यांना आपले राजकीय प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आरक्षणाचे लाभार्थी असणारे सर्व समाज घटकांना दिली आहे.आपल्या तुळजापूर विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार धनगर कन्या सुशिक्षीत, उच्च शिक्षीत अभ्यासु सामाजिक जाणीव असलेल्या डॉ स्नेहा सोनकाटे मॅडम यांच्या गॅस सिलिंडर चिन्हाला मतदान करुन आपले न्याय हक्कासाठी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
संपूर्ण देशामध्ये सर्व राज्यांत महाराष्ट्र प्रगल्भ राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे.कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, सानेगुरुजी, आण्णा भाऊ साठे, यांच्या विचारांचा प्रभाव आणि वारसा जपणारा महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते.आपण सर्वांनीच जबाबदारी घेऊन श्रद्धेय अँड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या परिवर्तन वादी लढ्यात सहभागी होवून डॉ. स्नेहा सोनकाटे मॅडम यांना विजयी करुया........
आर एस गायकवाड
सहसचिव उस्मानाबाद
वंचित बहुजन आघाडी
0 Comments