धाराशिव/राजगुरु साखरे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्ह्यातील चार मतदारसंघातून 164 उमेदवाराचे 223 अर्ज वैध ठरले आहेत . अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत ही चार नोव्हेंबर असली तरी दिवाळीनंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला जोर चढणार आहे राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 13 दिवस मिळणार आहे. अनेक इच्छुकांची उमेदवारी हे अंतिम टप्प्यात ठरली गेली आहे अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच खऱ्या अर्थाने निवडणुकीच चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुकांचे बंड पक्षाकडून थंड होणार का? हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे सध्या दिवाळी निमित्ताने उमेदवारांनी ही प्रचारावर जोर दिलेला नाही असे चित्र दिसून येत आहे.
0 Comments