सोशल मीडियामध्ये अडकली तरुणाई इंटरनेटच्या युगात पारावरील गप्पाचे फड इतिहास जमा
धाराशिव - मोबाईल इंटरनेटच्या अधिकाधिक वापरामुळे माणूस एकटा पडत चालला असून ग्रामीण भागात पारवर जाऊन मित्रांची गप्पा मारणे हा प्रकार इतिहास जमा होत आहे. आज मोबाईल शिवाय राहणे ही कल्पनाही करणे अवघड होत चालली आहे मोबाईल इंटरनेट वेगवान होण्याच्या अगोदर फावल्या वेळेत कुणाकडे तरी जाऊन बसणे व गप्पा मारणे हा बऱ्याच व्यक्तीचा आवडता छंद असायचा ग्रामीण भागात तर दिवसभर पारावर म्हणा किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालय किंवा एखाद्या मंदिराच्या ओट्यावर गप्पा मारताना कोणी ना कोणी बसलेली असायचे.हॉटेलच्याची टपरी पान टपरी असो किंवा किराणा दुकान कायम एक टोलकी गप्पा मारताना दिसायचे या गप्पा आता कुठेतरी हरवलेल्या दिसत आहेत.,लुप्त होत चाललेले आहेत गावातील पारावर पूर्वी घरातल्या समस्या पासून पीक पाणी, तसेच थेट देशाच्या राजकारणापर्यंत गप्पा मारल्या जायच्या याच पारावर पूर्वी गावातल्या गावातील समस्या तसेच भांडणाचा न्याय निवाडा ही केला जायचा गावांमधील पार आता केवळ कथेतील भाग बनत चालू आहे हे पार कधीपासून अस्तित्वात आला याबद्दल कुठे पुरावा मिळत नसला तरी हे पार म्हणजे गावातील ग्रामस्थांना व्यक्त होण्याची एक हक्काचे व्यासपीठ किंवा ठिकाणच होते जिथे आल्यानंतर गावात काय चालले आहे याची इन्तभूत खबर मिळायची मात्र आता तरुण पिढी मोबाईल मध्ये व्यस्त झाली आहे सकाळपासून सायंकाळपर्यंत जो तो मोबाईलवर घालवत आहे त्याच सोशल मीडियावर वापर वाढल्यापासून अनेक जण मोबाईल हातातून सोडेनासा झाला आहेत तरुण पिढी तर 24 तास मोबाईल मध्ये अडकलेली दिसत आहे त्यामुळे काळाच्या ओघात पारावरील गप्पाचे फड लुप्त होत असल्याचे जुने जाणकार सांगत आहेत.
0 Comments