Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रचारासाठीचा कॉल्समुळे मतदार वैतागले, कॉल कट केला तरी पुन्हा कॉल

प्रचारासाठीचा कॉल्समुळे मतदार वैतागले, कॉल कट केला तरी पुन्हा कॉल


तुळजापूर: विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून प्रचार सभांचा जोर वाढलेला आहे बहुतांशी उमेदवाराकडून मतदाराच्या मोबाईलवर मेसेजेस तर पाठवले जातात आहेत परंतु टेली कॉलिंग द्वारेही उमेदवाराचे आवाजात प्रचार केला जात आहे अवेळी अनामिक कॉल्स येत असल्यामुळे मतदार चांगलेच वैतागले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी दिनांक 20 रोजी मतदान केले जाणार आहे सोमवार दिनांक 18 रोजी सायंकाळी प्रचार तोफा थंडावणार आहेत त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराकडून प्रचारासाठी केवळ जेमतेम काही तास शिल्लक राहिले आहेत त्यामुळे उमेदवाराकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला आहे मिळेल तो पर्याय यासाठी उमेदवाराकडून वापरला जात आहे. सर्व प्रकारच्या प्रचारावर भर दिला जात आहे उमेदवारांची प्रचार पत्रके वाटण्यासाठी तसेच सभेत गर्दी करण्यासाठी रॅलीत सहभागी होण्यासाठी रोजंदारीने माणसे आणली जात आहेत.

प्रचार आता हायटेक झाला आहे सोशल मीडियावर पोस्ट टाकून व्हिडिओ टाकून रिल्स बनवून प्रचार केला जात आहे यात भर पडली आहे टीव्ही कॉलिंग ची याद्वारे मतदाराच्या मोबाईलवर थेट संपर्क साधला जात असून प्रचाराची कॅसेट वाजवली जात आहे त्यात मी अमुक अमुक उमेदवार असून अमुक पक्षाचा उमेदवार आहे येत्यात वीस तारखेला अमुक क्रमांकाचे अमुक क्रमांकाचे बटन दाबून आपले मत मलाच द्यावे असा संवाद मतदारांना ऐकवला जात आहे. यात उमेदवाराची तील कॉल तर येतातच परंतु राज्य पातळीवरील व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची स्वतंत्र कॉल्स येत आहेत अनामिक वेळी येणारे हे कॉल मतदारांना त्रासदायक ठरत असून मतदार आता या प्रचाराला कंटाळून गेले आहेत.

हे टेलीकॉल आल्यानंतर हातातील काम बाजूला ठेवून हा फोन उचलावा लागतो फोन उचलल्यावर आपण इकडून हॅलो म्हणतो व तिकडून कॅसेट सुरू होते या प्रकारामुळे रोज मतदारांना मानसिक त्रासाला सामोरे  जावं लागत आहे बरेच जण कॅसेट सुरू झाल्या झाल्या फोन कट करून टाकत आहेत. त्यामुळे लोक अशा प्रकारला अक्षरशा वैतागले आहेत.

Post a Comment

0 Comments