Hot Posts

6/recent/ticker-posts

सख्खा भाऊ, पक्का वैरी! शेतीच्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून



परभणी : सेनगाव तालुक्यातील शेगाव घोडके येथे सख्या भावानेच खून करून शेताला लागून असलेल्या पाटात पुरून टाकल्याची घटना शनिवारी दि, 14 रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात एकच खळखळ उडाली आहे. मोठ्या भावानेच वाटणीच्या कारणावरून लहान भावाचा गळा दाबून मारून टाकल्याचे पोलिसांनी सांगितले शिवाजी किसन खोडके वय (23) राहणार शेगाव घोडके असे खून झालेल्यांचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेगाव खोडके येथील किसन खोडके यांना सोळा एकर शेत जमीन असून त्यांचे दोन मुले या सोळा एकर जमिनीवर शेती व्यवसाय करीत होते मोठा मुलगा हरी खोडके याचे लग्न झाले होते त्याला एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. तर लहान मुलगा शिवाजी खोडके यांचे लग्न झाले नव्हते हरी व शिवाजी यांची 16 एकर शेतीच्या वाटणीवरून घरगुती छोटे-मोठे वाद चालू होते अशी चर्चा घटनास्थळावरील ग्रामस्थांकडून ऐकण्यास मिळाली. लहान भाऊ शिवाजी खोडके वय 23 हा घरातून गुरुवारी दिनांक बारा रोजी निघून गेला असल्याचे गोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिनांक 13 रोजी हरवल्याची तक्रार हरी खोडके या मोठ्या भावाने दाखल केली होती.

हरवल्याची तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्यामुळे पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता पोलिसांनी गुप्त माहितीवरून या दोघा भावांमध्ये वाटणीच्या कारणावरून वाद होत होते असे पोलिसांना माहिती मिळाली त्या माहितीवरून गोरेगाव पोलिसांनी हरी किसन खोडके याला ताब्यात घेतली असता त्यांनी शनिवारी दिनांक 14 रोजी त्याच्या स्वतःच्या शेताला लागून पांडे यांच्या शेताकडे जाणाऱ्या पाटामध्ये खड्डा खोदून शिवाजी खोडके यांचा गळा दाबून मारून पुरून टाकले असल्याची कबूलित हरी किसन खोडके यांनी पोलिसांना दिली.

त्यावरून गोरेगाव पोलिसांनी शिवाजी खोडके यांचे पांडे यांच्या शेताकडे जाणाऱ्या पाटामध्ये पोलिसांनी पुरून टाकलेली जागा खोदल्यानंतर शिवाजी खोडके यांचे पुरलेले प्रेत बाहेर काढले हे प्रेत शिवाजी घोडके यांचे आहे असं नातेवाईकांनी सांगितले गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शेव विच्छेदन करण्यात आले सदरील घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे ,गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एम. जळके व त्यांचे पोलीस पथकाने भेट देऊन आरोपी हरी किसन खोडके याला गोरेगाव पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Post a Comment

0 Comments