धाराशिव :श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महापरिनिर्वाण दिन व विविध सत्कार संपन्न
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, उपमुख्याध्यापक श्री. प्रमोद कदम सर व इतर मान्यवरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर दिनांक ४ व ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर युवा महोत्सवातील विजयी स्पर्धकांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच खो-खो खेळातील वेगवेगळ्या मुला-मुलींच्या संघातील, वयोगटातील खेळाडूंचे व क्रीडा क्षेत्रातील विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचाही मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. जिल्हास्तर युवा महोत्सवातील स्पर्धकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक हजर होते. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments